वायरमनचे दैव बलवत्तर म्हणून जीवावर आलेले हातावर बेतले !
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वरणगाव येथील विद्युत वितरण कंपनीतील बाह्य स्रोतकर्मचारी वायरमन रोशन निवृत्ती चौधरी ३०हे इन्व्हर्टरचा बॅक करंट लागल्यामुळे वीज पोलवरून खाली पडले व जखमी झाले आहेत .
याबाबत येथिल सब इंजिनिअर दत्तात्रय पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून येथिल खिडकी वाड्यातील डिपीवर लाईनचा फॉल्ट काढणेसाठी रोशन चौधरी व वायरमन नदिम बादशहा काझी ( ३१ ) हे गेले होते . त्यावेळी पोलवर चढलेला रोशन चौधरी यास इन्व्हर्टरचा बॅक करंट लागून तो खांबावरून खाली पडला त्याच्या उजव्या हाताला जबर मार लागून हात फ्रॅक्चर झाला असुन त्याचेवर निलेश महाजन पिळोदेकर साई पुष्प अॅक्सीडेंट हॉस्पिटल मधे उपचार सुरु आहेत . त्याची प्रकृती धोक्याबाहेर असुन जीवावर आलेले हातावर निभावले अशी प्रतिक्रिया दिली असुन देवाचे आभार मानले आहे .