Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हावाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले !

वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले !

वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले !

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील निंभोरा येथे वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडले आहे. ही कारवाई मंडळ अधिकारी रवींद्र वानखडे यांच्या पथकाने केली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,निंभोरा बुद्रुक ता. रावेर येथील मंडळ अधिकारी रवींद्र वानखेडे, तलाठी दुर्गेश भालेराव, तलाठी प्रशांत जाधव यांनी दसनूर लगत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर थांबवले. त्याच्याकडे परवाना विचारला असता आढळून आला नाही. ट्रॅक्टरचालक व मालक ईश्वर विठ्ठल कोळी रा. निंभोरा बुद्रुक हा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. १९ सी.४०९३ मधून सुकी नदीतील वाळू नेताना आढळून आला. ईश्वर कोळी याने गुन्हा कबूल केला. हे वाहन पुढील कारवाईसाठी रावेर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या