वाळूच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणात ३ ट्रॅक्टर जप्त !
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पोलिसांनी वाळूच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणात तीन ट्रॅक्टर जप्त केले आहे. त्यातून तीन ब्रास वाळूही जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिसांच्या पथकाने नेहते गावाजवळ शुक्रवारी रात्री केली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, नेहते गावातील स्मशानभूमी जवळील रोडवर तापी नदीपात्रातून अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून तीन अनोळखी इसम हे लाल रंगाचे ट्रॅक्टर (क्र. एम. पी. ३२/१७०८), विना नंबरचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर ट्रॉली, निळ्या रंगाचे ट्रॅक्टर (क्र एम. एच. १९ /ए. पी ८८०९) व लाल रंगाची विना नंबरची ट्रॉली अशा तीन ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाळू चोरी करताना आढळून आले. रावेर पोलिस स्टेशनचे फौजदार मनोज महाजन, पो. कॉ. सचिन घुगे, पो. कॉ. प्रमोद पाटील, पो. कॉ. महेश मोगरे, पो. कॉ. नितीन सपकाळे, पो. कॉ. चैतन्य नारखेडे यांच्या पथकाने ही धडक कारवाई कार्यवाही केली.