Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हावाळूमाफियांनी घातली महसूल कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत : गुन्हा दाखल !

वाळूमाफियांनी घातली महसूल कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत : गुन्हा दाखल !

वाळूमाफियांनी घातली महसूल कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत : गुन्हा दाखल !

धरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील आव्हाणी येथे अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी महसूल कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना दि. ३ डिसेंबर रोजी दुपारी घडली होती.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मंडळ अधिकारी लक्ष्मण बाविस्कर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार धरणगाव पोलिसात सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. धरणगाव पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली. अक्षय भास्कर पाटील, उज्ज्वल कैलास पाटील गणपत पुंडलिक नन्नावरे, जितेंद्र लक्ष्मण नन्नावरे, विशाल विजय सपकाळे, किरण त्रंबक पाटील, ज्ञानेश्वर गुलाब पाटील (पाळधी, बांभोरी) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या गुन्ह्यातील वाळूचे ट्रॅक्टर जप्त करून आरोपी विजय जनार्दन तायडे यास अटक करण्यात आली आहे. असे ८ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून, ८ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक पवन देसले, सपोनि प्रशांत कंडारे, सपोनि निलेश वाघ व धरणगाव पो.स्टे. तसेच पाळधी दूरक्षेत्राचे अंमलदार यांनी केली आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या