वाहनात घरगुती गॅस भरला अन पोलिसांनी घेतले ताब्यात
पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वाहनात अवैधरीत्या घरगुती गॅस इंधन म्हणून भरत असताना सहा सिलिंडरसह गॅस भरण्याचा इलेक्ट्रिक पंप व इतर साहित्य हस्तगत करीत एकाविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील जारगाव चौफुलीवर एका दुकानात घरगुती गॅसचा वाहनामध्ये इंधन म्हणून वापर करण्यासाठी अवैधरीत्या पंप सुरू असल्याची खबर पाचोरा पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी स्वतः पोलिस पथकासह दुकानावर छापा टाकून सहा गॅस सिलिंडरसह मशीन, तसेच एक हॉर्सपॉवरची इलेक्ट्रिक मोटार गॅस भरण्याची मशीन स्प्रेयर मशीन, तसेच इतर साहित्य असा एकूण ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. तसेच चारचाकी गाडी (एमएच१९/डीव्ही७३९४) पोलिसांनी जप्त केली. यावेळी वाहनात गॅस भरताना ब्रिजेश हिम्मत जाधव (२२, कुन्हाड खुर्द) या युवकास पोलिसांनी अटक केली आहे.