Thursday, March 27, 2025
Homeजळगावविकास कामे कोणती आणि कोणत्या योजनेतून..?

विकास कामे कोणती आणि कोणत्या योजनेतून..?

विकास कामे कोणती आणि कोणत्या योजनेतून..?

अधिकारी आणि ठेकेदारांचे संगनमत आणि लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष.

यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – यावल तालुक्यात बऱ्याच ठिकाणी विकास कामे सुरू आहे परंतु ही विकास कामे कोणती आणि कोणत्या योजनेतून,किती रकमेची आहे याबाबतचे फलक संबंधित ठेकेदार आणि अधिकारी संगनमताने लावत नसल्याने यात ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींची शुद्ध फसवणूक आणि दिशाभूल केली जात असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
यावल तालुक्यातील बोरखेडा खुर्द गावाजवळ एकाच ठिकाणी एकाच सरळ रेषेत वेगवेगळी दोन विकास कामे सुरू आहेत परंतु त्या ठिकाणी ठेकेदाराने आणि संबंधित अधिकाऱ्याने विकास कामाचा फलक न लावल्याने ही कामे कोणत्या निधीतून,कोणती योजना आहे,कोणत्या विभागामार्फत किती रकमेची,कोणता ठेकेदार काम करीत आहे याबाबत आणि सुरू असलेले बांधकाम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणेच होत आहे किंवा नाही तसेच बांधकाम साहित्य उत्कृष्ट प्रतीचे किंवा निकृष्ट प्रतीचे आहे याची खात्री करण्यासाठी संबंधित विभागाचा कोणताही जबाबदार अधिकारी, कर्मचारी कामाच्या ठिकाणी उपस्थित रहात नसल्याने बांधकाम मजूर आपल्या सोयीनुसार आणि मर्जीनुसार काम करीत असल्याने ग्रामस्थांसह तालुक्यात विकास कामाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या