विकास लवांडे यांनी बेताल वक्तव्य करून धार्मिक भावना भडकाविल्याने गुन्हा दाखल करा :
शिवप्रतिष्ठानची मागणी.
यावल दि.१५ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे यांनी बेताल वक्तव्य करून धार्मिक श्रद्धा व भावना भडकावल्या म्हणून त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यावल तालुकाप्रमुख सागर लोहार व पदाधिकारी कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली.
पोलीस निरीक्षक यावल यांच्याकडे आज शनिवार दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यावल तालुकाप्रमुख सागर कृष्णा लोहार व पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे की,दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ता समाज कंटक विकास लवांडे
याने खालील आशयाचे भावना दुखवणारे व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे वक्तव्य केले.
“हा संभाजी भिडे स्वत:ला गुरूजी समजतो त्याने हजारो धारकरी पोरं जी आहेत ज्यांना स्वतःची विवेकबुद्धी वापरायची नसते अशा धारकरांना घेऊन तिथे गडकिल्ले मोहीम वैगरे राबविण्यात त्यांचा काही तरी प्रकार असतो, ऐतिहासिक गडांचे काहीतरी सांगायचं,शिवाजी महाराजांच अर्धवट काहीतरी चुकीचा इतिहास सांगायचा त्यांची माथी
भडकाविण्याचं कार्यक्रम करायचा, त्यांना एक हिंदू आतंकवादी बनविण्याचाच तो एक प्रकार आहे, धारकरी हे आतंकवाद्याच्याच मोड मध्ये जाणारे असतात, हे सद्सद्विवेक बुद्धीने विचार करणारे नसतात…” या आशयाचे अतिशय संतापजनक क्लेशदायी बिनबुडाचे बेताल वक्तव्य करून माननीय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक व लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले परम पुजनीय संभाजी भिडे गुरूजी यांचे विषयी व
श्री शिवछत्रपती प्रभूंच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या दुर्गांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जाणाऱ्या दुर्गप्रेमी धारकरांनविषयी अतिशय बिनबुडाचे वक्तव्य करून त्यांची आतंकवाद व आतंकवाद्यांशी संतापजनक तुलना केली.
हे वक्तव्य मी व माझे असंख्य धारकरी धर्मबंधु यांनी दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी यु ट्यूबवर सत्याग्रही या चॅनेलवर पाहिले यामुळे माझ्या व धारकरी धर्म बंधूंच्या तसेच हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
हे वक्तव्य करणाऱ्या ह्या शरद पवार गटाच्या तथा कथीत प्रदेश प्रवक्त्यावर आम्हा हिंदु बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यावल तालुकाप्रमुख सागर कृष्णा लोहार यांच्यासह स्वप्निल करंडे सागर कोळी राजश्री मयूर शिर्के पार्थ सोनवणे ऋषिकेश कोळी कमलेश शिर्के भरत बारेला सागर इंगळे इत्यादी धारकऱ्यांनी केली आहे.