Wednesday, March 26, 2025
Homeजळगावविद्यार्थ्यांनी सायकल रॅलीद्वारे केली भुसावळ शहरात मतदार जनजागृती

विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीद्वारे केली भुसावळ शहरात मतदार जनजागृती

विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीद्वारे केली भुसावळ शहरात मतदार जनजागृती

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मतदार जागरूकता व सहभाग अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढली. सायकलवर मतदार जनजागृतीचे फलक लावून ही रॅली भुसावळ शहराच्या गल्लीबोळातून काढण्यात आली.

20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार मतदार जनजागृती अभियानांतर्गत ही सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीत महाराणा प्रताप विद्यालय व अहिल्यादेवी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सायकल रॅलीचा शुभारंभ महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वीप सहाय्यक अधिकारी राहूल पाटील, स्वीप सहाय्यक अधिकारी प्रमोद आठवले, स्वीपचे युथ आयकॉन शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगदीश पाटील, वैभव पुराणिक, सुधाकर सपकाळे, आशीष निरखे, कोमल जोशी, वंदना ठोके यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती. ही सायकल रॅली महाराणा प्रताप विद्यालय, आनंद नगर, पंचशील नगर, गंगाराम प्लॉट, आठवडे बाजार, न्यू एरिया वार्ड, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, वाल्मीक चौक, जामनेर रोडमार्गे महाराणा प्रताप विद्यालयापर्यंत काढण्यात आली. रॅलीत तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांच्यासह शिक्षक आणि सुमारे शंभर सायकलस्वार विद्यार्थी सहभागी झाले होते. मतदारांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन रॅलीदरम्यान करण्यात आले. त्यानंतर महाराणा प्रताप विद्यालयात आयोजित समारोपीय कार्यक्रमात स्वीप मोहिमेविषयी डॉ. जगदीश पाटील यांनी माहिती दिली. यावेळी तहसीलदार श्रीमती नीता लबडे म्हणाल्या की, रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयातील सर्व व्यक्तींना आग्रहाने मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे. लोकशाहीत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्वांनी तत्पर राहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच मतदार जनजागृती मोहिमेत सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले. सायकल रॅली यशस्वीतेसाठी स्वीप नोडल अधिकारी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, राहूल पाटील, प्रमोद आठवले, डॉ. जगदीश पाटील यांच्यासह महाराणा प्रताप विद्यालय व अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या