विना नंबर प्लेटच्या वाहनाने गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा ; जिल्हाधिकारी यांचे आदेश
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जिल्ह्यात विना नंबर प्लेटच्या वाहनानी सर्रास गौण खनिजाची वाहतूक केली जात असून यावर आता महसूल विभाग ,पोलीस विभाग , राज्य परिवहन अधिकारी या विभागां ची करडी नजर राहणार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जळगांव यांनी दिले आहे.
याबाबतचे आदेश प्रांताधिकारी, तहसीलदार, आरटीओ व पोलीस विभागाला देण्यात आले असून हे संयुक्तपणे पथक नेमून बिना नंबरच्या वाहनाने गौण खनिजाची वाहतूक करीत असल्यास त्यांच्यावर कारवाई सं युक्त पणे करतील त्यांनी दंड न भरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. दोन दिवसात झालेल्या कारवाईमध्ये पाच वाहनावर या पद्धतीने कारवाई करण्यात आली असून यापुढे सुद्धा ही कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.यामुळे अवैधपणे बिना नंबर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहन मालकाचे घबराट निर्माण झाली आहे. अश्या वाहनावर कारवाई व्हावी अशी अनेक दिवसांपासून मागणी होत होती.जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यामुळे आता आरटीओ विभाग महसुल विभाग व पोलीस सतर्क झाले आहे .