विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ, सासरच्यांवर वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी -विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी पर्यंत येथील सात जणांवर वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, विवाहितेला शारीरीक,मानसिक ञास देवुन गांजपाठ करुन मारहान केली व तुझे आई-वडीलांनी तुझ्या पहील्या नव-याला जसे सात तोऴे सोने व 50 हजार रुपये दिले होते तसेच मला दिले तर तुला चांगली वागणुक देवु नाही तर तुला अशा ञास होईल अशी धमकी दिली. या कारणावरून सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार दि ६ जून २०१७ चे एक महीन्यानंतर ते दि. २२ सप्टेबर २०२२ पावेतो या कालावधीत म्हणून वरणगाव पोलिसात फिर्यादीने ७ ऑक्टोबर रोजी सासरच्या मंडळीं वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विवाहीतेचे पती निलेश विनायक रडे, सासु-सुवर्णलता विनायक रडे,जेठ-संदीप विनायक रडे, जेठाणी-कांचन संदीप रडे,नणंद-चित्रा देवेंद्र नारखेंडे, नणंद-माधुरी पंकज पाटील,नणंदोई- पंकज प्रभाकर पाटील सर्व राहणार कल्याण जिल्हा ठाणे यांच्या विरुद्ध दिपाली निलेश रडे वय.33 धंदा घरकाम राहणार जळगाव लग्नानंतर खडक पाडा रोड,शेलार रेसीडेन्सी, कल्याण जिल्हा ठाणे हल्ली मुक्काम मकरंद नगर,वरणगाव ता.भुसावळ यांनी वरणगांव पोलीस स्टेशन भाग 5 CCTNS NO186 /24भा दं वि कलम 498(a), 323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर अधिक तपास स .पो.नि जनार्दन खंडेराव यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक फौजदार नागेंद्र तायडे करीत आहे .