Monday, March 24, 2025
Homeगुन्हावृद्ध महिलेच्या घरात चोरी करणाऱ्याला अटक !

वृद्ध महिलेच्या घरात चोरी करणाऱ्याला अटक !

वृद्ध महिलेच्या घरात चोरी करणाऱ्याला अटक !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या घरात चोरी करणाऱ्या वैभव उर्फ गोल्या दत्तात्रय पाटील (वय २४, रा. गणपतीनगर) याच्या रामानंद नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दहा हजारांची रोकड आणि ९ हजार रुपयांचे तांबे पितळाचे भांडे हस्तगत करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरात राहणाऱ्या विमल शिरसाठ या आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या घरातून २५ हजारांची रोकड आणि तांबे पितळाचे भांडे चोरून नेले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात् गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असतांना ही घरफोडी शिरसाठ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या वैभव उर्फ गोल्या पाटील याने केल्याची माहिती पोहेकॉ जितेंद्र राजपूत यांना मिळाली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, इरफान मलिक, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, उमेश पवार, रविंद्र चौधरी यांचे पथक तयार केले.
पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासात संशयित वैभव उर्फ गोल्या पाटील याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याच्याजवळून दहा हजारांची रोकड आणि ९ हजारांचे तांबे पितळाचे भांडे असा ऐवज हस्तगत करण्यात आल्या आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ जितेंद राजपूत हे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या