Sunday, March 16, 2025
Homeगुन्हाशहरातील माजी नगरसेवकाची ९ लाखात फसवणूक ; गुन्हा दाखल

शहरातील माजी नगरसेवकाची ९ लाखात फसवणूक ; गुन्हा दाखल

शहरातील माजी नगरसेवकाची ९ लाखात फसवणूक ; गुन्हा दाखल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे आश्वासन देत जळगावचे माजी नगरसेवक नवनाथ विश्वनाथ दारकुंडे यांची तब्बल ९ लाख १८ हजार ५०० रुपयांत ऑनलाइन फसवणूक झाली. या संदर्भात गुरुवारी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीनुसार नवनाथ विश्वनाथ दारकुंडे (वय ५५, रा. शिवाजीनगर, जळगाव) यांना त्यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून किरण आनंदा सानप, संगीता किरण सानप, समीक्षा किरण सानप (तिघे रा. ठाणे), शैलेश विनोदराय शुक्ला (रा. मुंबई) आणि दिवाकर राय (रा. दिल्ली) या पाच जणांनी वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ९ लाख १८ हजार ५०० रुपये स्वीकारले. त्यानंतर त्यांच्या मुलाला नोकरी लावून न देता त्यांची फसवणूक केली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दारकुंडे यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन या संदर्भात तक्रार केली आहे. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या