शहरातील हुडको परिसरात गावठी पिस्तूलसह तिघांना अटक !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पिंप्राळा हुडको परिसरात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांना रामानंदनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.कल्पेश ऊर्फ प्रबुद्ध गुलाब सपकाळे (२१, हुडको), गौरव समाधान सोनवणे (२१, गॅलेक्सी कॉलनी) व लीलाधर देविदास कोळी (३५, रा. हिराशिवा कॉलनी) यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.