Monday, April 28, 2025
Homeगुन्हाशहरातील हॉटेलात राडा : चौघांनी केली चालकाला जबर मारहाण !

शहरातील हॉटेलात राडा : चौघांनी केली चालकाला जबर मारहाण !

शहरातील हॉटेलात राडा : चौघांनी केली चालकाला जबर मारहाण !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील गेंदालाल मिल परिसरात रविवार दि. १६ मार्च रोजी दारू पिऊन आलेल्यांना हॉटेलमध्ये आरडाओरड करण्यास मज्जाव केल्याचा राग आल्याने हॉटेल चालक शेख शाहरुख शेख गणी (२९, रा. गेंदालाल मिल परिसर) यांना चार जणांनी मारहाण केली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शेख यांच्या हॉटेलमध्ये आदेश, सोन्या, आवेश (पूर्ण नाव समजू शकले नाही) आणि त्यांचा एक साथीदार असे चार जण आले होते. दारूच्या नशेत चौघेही आपसात मस्करीने एकमेकांना शिवीगाळ करीत आरडाओरड करीत होते. त्यावेळी शेख यांच्या आईने त्यांना शांततेत जेवण करण्याविषयी सांगितले, तरीही ते ऐकत नसल्याने शेख त्यांना समजावण्यासाठी गेले असता, त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या