शहरातून अल्पवयीन मुलीला पळविले !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्या आई वडीलांच्या रखवालीतून पळवून नेले.
ही घटना दि. १८ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, मुलीच्या कुटुंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून न आल्याने अखेर त्यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.नि.रंगनाथ धारबळे करीत आहे