Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाशहरातून १७ वर्षीय मुलीला पळविले !

शहरातून १७ वर्षीय मुलीला पळविले !

शहरातून १७ वर्षीय मुलीला पळविले !

जळगाव खान्देश विकास न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील खान्देश मिल कॉलनीतील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीचे फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता समोर आली आहे.

रविवारी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिला काहीतरी आमिष दाखवत अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पिडीत मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या