शहरात घरफोडी ; पंचवीस हजारांचा मुद्देमाल लांबविला !
भुसावळ – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील श्रीगंगानगर वांजोळा रोड भागातील रहिवाशी परमजितसिंह दलविंदरसिंह बन्सल यांचे कंन्सलटेशनचा व्यापार प्लॉट नं.९, सोपान कॉलनी,शांती नगर येथे सुरू असून कोणीतरी अज्ञात चोरट्यांने घराचे समोरील लोखंडी दरवाजाचे व लाकडी दरवाजाचे कडी कोंडा तोडून पंचवीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना ता.२४ रोजी सायंकाळी पाच ते २५ रोजी सकाळी अकरा वाजेला सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, कंन्सलटेशनचे काम आटोपून परमजितसिंह दलविंदरसिंह बन्सल राहते घरी निघून गेले.दुस-या दिवशी ता.२५ रोजी सकाळी ११.०० वाजता नेहमी प्रमाणे कामावर प्लॉट नं.०९, सोपान कॉलनी, शांती नगर,भुसावळ,येथे सकाळी ११.३० वाजता पोहचलो आणि मेनगेट उघडून आत गेलो असता घराचे समोरील लोखंडी दरवाजाचे व लाकडी दरवाजाचे कडी कोंडा तोडून एक तुटलेले कुलुप पडलेले दिसले.हाँल मधे आत गेलो असता सर्व सामान अस्थाव्यस्त पडलेला होता.हॉल मधे लावलेले टिव्ही, ब्लू टुथ सिस्टम पण मला जागेवर दिसले नाही.नंतर बेडरुम मधे आत गेलो असता तेथील दोन स्टिलचे कपाटाचे दरवाजे तोडून लाँक तुटलेले दिसले तेव्हा खात्री झाली की कोणतरी अज्ञात चोरट्याने कंन्सटेशन काम करण्याचे बंद घराचे
दरवाज्याचे कुलुप कोंडा तोडुन घरात अनाधिकारे प्रवेश करून घराचे हॉल मधील व बेडरुम मधील दोन कपाटातील लॉकर मधील पंचवीस हजार आठशे रुपये किंमतीचा ईलेक्ट्रीक सामान माझे समंतीवाचून लबाडीच्या इराद्याने चोरुन नेले आहे म्हणून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे परमजितसिंह दलविंदरसिंह बन्सल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे कंन्सलटेशनचे कामाचे घरामागील शासकीय रेशन गोदामाचे ऑफीसचे कडी कोंडा तोडून कागदपत्रे अस्थाव्यस्त करून चोरीचा प्रयत्न केला आहे.