Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हाशहरात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला अटक !

शहरात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला अटक !

शहरात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला अटक !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील डीमार्ट परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या व्यक्तीवर रामानंद नगर पोलिसांनी कठोर कारवाई केली. शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, याप्रकरणी आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, संशयित आरोपी विनोद बाविस्कर (रा. बांभोरी, ता. धरणगाव) याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती. आरोपी बेकायदेशीरपणे तलवार घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री आरोपीला तलवारीसह पकडले. घटनास्थळी तलवार जप्त करून त्याच्या ताब्यातून महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करण्यात आले. शनिवारी, १८ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सपकाळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या