शहरात तिघांना केली लोखंडी रॉडने जबर मारहाण
अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रस्त्यात का उभा राहतो, या कारणावरून दोघा जणांनी तिघांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना २६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गांधली येथील बसस्थानकावर घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, यात एकाच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याला ६ टाके पडले आहेत. गौरव रवींद्र बोरसे हा रस्त्यात उभा असताना रोहिदास खंडू पाटील याने शिवीगाळ केली. याबाबत जाब विचारण्यासाठी रवींद्र नीलकंठ बोरसे व चेतन बोरसे हे रोहिदासच्या घरी गेले असता त्याचा मुलगा वैभव रोहिदास पाटील याने हातातल्या लोखंडी रॉडने डोक्यावर वार केला. भांडण आवरायला गौरव व चेतन ही मुले आली असता वैभवने दोघांनाही रॉडने मारहाण केली. रवींद्र बोरसे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून रोहिदास पाटील व वैभव पाटील यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ कैलास शिंदे करीत आहेत.
दुसऱ्या गटातर्फे रोहिदास पाटील यांनी फिर्याद दिली असून गौरव बोरसे हा रस्त्यात उभा होता. त्याला बोलायला गेलो असता त्याने पत्नीला ढकलले. तसेच घरी निघून गेल्यानंतर रवींद्र बोरसे, गौरव बोरसे, चेतन बोरसे घरी आले व त्यांनी हाणामारी सुरू केली. ठार मारण्याची धमकी दिली. गौरव याने हातातील दगड घेऊन पोटात मारला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकों संदेश पाटील करीत आहेत