Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाशहरात दहशत माजवणारा गावठी कट्टयासह अटक!

शहरात दहशत माजवणारा गावठी कट्टयासह अटक!

शहरात दहशत माजवणारा गावठी कट्टयासह अटक!

पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पाचोरा शहरातील भारत डेअरी चौकात गावठी कट्टयासह फिरणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून २० हजाराचे गावठी पिस्टल जप्त करण्यात आले असून, त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, त्यांच्या पथकाने भारत डेअरी चौकात सापळा रचला होता. संशयित व्यक्तीच्या चौकशीत त्याचे नाव अश्विन उर्फ विशाल शंकर पाटील (रा. देशमुखवाडी, ता. पाचोरा) असल्याचे समजले. झडती दरम्यान त्याच्या कमरेला गावठी कट्टा आढळून आला. ही कारवाई पो.नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. शेखर डोमाळे, पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पो.ना. रणजित जाधव, पो.हे.कॉ. राहुल महाजन, पो.कॉ. प्रमोद ठाकूर यांनी केली. तपास सपोनि दिनेश भदाणे करत आहेत.

गेल्या काही महिन्यांत पाचोरा शहरात गावठी कट्टे, चॉपर तसेच इतर शस्त्रसाठ्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. स्थानिक अवैध व्यवसायांचे वाढते जाळे आणि काही गैरकृत्यांना मिळणारे अभय, यामुळे तरुणाई गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र आहे. पोलिस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याची गरज असून, नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या