शहरात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून दोघांना मारहाण
चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील मेन रोडवरील लोहाना पेट्रोल पंपावर दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी शहरातील पंकज नगर मधील रहिवासी असलेल्या दाम्पत्याला दोन कर्मचाऱ्यांनी मारहाण केली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या घटनेमध्ये मनीलाल बाबुराव पाटील (५८), मनीषा मनीलाल पाटील (५२) रा पंकज नगर हे जखमी असून ते चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दि १३ रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी पंकज नगर मधील मणिलाल पाटील हे आपल्या दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी शहरातील लोहाना पेट्रोल पंपा वर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. त्याठिकाणी पेट्रोल भरण्यावरून मनीलाल पाटील व कर्मचारी रमाकांत नेवे, नरेंद्र वाणी यांच्यात बाचाबाची होऊन मनीलाल पाटील यांना मारहाण केली आणि त्यांचे कपडे फाडले. तर यावेळी सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी मनीषा पाटील यांना देखील हाताला मार लागला आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.