शहरात बंद घर चोरट्यांनी फोडले : दागिने नेले चोरून
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बऱ्हाणपूर येथे नातेवाइकांकडे जाण्यासाठी निघालेल्या शेख जब्बार शेख करीम (५५) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी रोकड, सोने- चांदीचे दागिने असा ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी पहाटे तांबापुरा परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तांबापुरा परिसरात शेख जब्बार शेख करीम यांचा पुस्तकांच्या विक्रीसह भंगार साहित्य वस्तू खरेदी करण्याचा व्यवसाय आहे. बऱ्हाणपूर येथे नातेवाइकांकडे जाण्यासाठी शेख कुटुंब गुरुवारी मध्यरात्रीनंतर घराला कुलूप लावून निघाले. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी (१७ जानेवारी) त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा आणि कुलूप तोडल्याचा प्रकार शेजारच्यांनी शेख यांना कळविला. त्यावेळी ते घरी परतले.