Sunday, March 16, 2025
Homeजळगावशहरात भर दुपारी दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने लांबवले अडीच लाखांची रोकड !

शहरात भर दुपारी दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने लांबवले अडीच लाखांची रोकड !

शहरात भर दुपारी दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने लांबवले अडीच लाखांची रोकड !

चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील गजबजलेल्या ठिकाणाहून भर दुपारी एका इसमाच्या बँकेतून काढून आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेल्या अडीच लाख रुपयांवर अज्ञात दोन चोरट्यांनी हात साफ केला. पोलिस स्टेशनच्या खालीच ही चोरीची घटना घडल्याने नागरिकांत चर्चेचा विषय आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तालुक्यातील गणपूर येथील रहिवासी असणारे गोपाल संतोष पाटील (३९) हे दि. १२ रोजी दुपारी १ ते १:३० वाजेच्या सुमारास गांधी चौक भागात असणाऱ्या बँकेत गेले. त्यांनी आपल्या खात्यातून लागणारी अडीच लाख रुपयांची रक्कम काढली. कापडी पिशवीत ही रक्कम आणि कागदपत्र त्यांनी बाहेरच असणाऱ्या आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. एका परिचयाच्या वृध्दास गाडीजवळ थांबायला सांगून गोपाल पाटील पुन्हा बँकेत गेले. मात्र वृध्द गाडीजवळ न थांबता निघून गेला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या