शहरात महिला शिक्षिकेचा विनयभंग ; मुख्याध्यापकसह चेअरमनवर गुन्हा दाखल!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील गेंदालाल मिल भागातील एक हायस्कूलमधील एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा शाळेचे मुख्याध्यापक आसीफ पठाण व चेअरमन मुश्ताक अहमद इक्बाल या दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,गेंदालाल मिल भागात असलेल्या हायस्कूलमधील एका शिक्षिकेचा २८ जानेवारी व ८ फेब्रुवारी रोजी मुख्याध्यापक आसीफ पठाण व चेअरमन मुश्ताक अहमद इक्बाल यांनी शाळेतील आवारात व शौचालय परिसरात विनयभंग केल्याची तक्रार शिक्षिकेने केली आहे. यासह शिक्षिका शाळेत शिकवत असताना, त्यांचा डावा हात पकडून दमदाटीदेखील केली. यासह शिवीगाळदेखील केली. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी शिक्षिकेने शहर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रदीप पाटील करत आहेत.