शासकीय स्तरावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गेल्या १० वर्षात प्रथमच उपस्थित राहणारे ठरले आमदार अमोल दादा जावळे.
यावल दि.२७ ( सुरेश पाटील ) यावल तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात गेल्या १० वर्षात प्रथमच उपस्थित राहणारे ठरले भाजपाचे लोकप्रिय तरुण तडफदार आमदार अमोलदादा जावळे.
रविवार दि.२६ जानेवारी २०२५ रोजी यावल तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचा शासकीय स्तरावरील प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ अमोलदादा जावळे यांच्या व पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर,महसूल अधिकारी कर्मचारी, पोलीस दल,होमगार्ड पथक,शालेय विद्यार्थी,विद्यार्थिनी,सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक, प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
७५ वा प्रजासत्ताक दिनाचे विशेष महत्त्व म्हणजे यावल तहसील कार्यालयात गेल्या १० वर्षातील इतिहासात कोणताही आमदार उपस्थित राहिलेला नाही परंतु प्रथमच रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे लोकप्रिय तरुण तडफदार आमदार अमोलदादा जावळे उपस्थित राहिल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आपल्या यावल तालुक्यातील महसूल कामकाजाचा थोडक्यात आढावा उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांना सांगितला.यावेळी आमदार अमोलदादा जावळे,माजी आमदार रमेशदादा चौधरी,पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर,प्र.गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके,तहसीलचे निवासी नायब तहसीलदार व इतर विभागातील नायब तहसीलदार, अव्वल कारकून,लिपिक,मंडळ अधिकारी,तलाठी,यांच्यासह हाजी शब्बीर खान,डॉक्टर कुंदन फेगडे, भगतसिंग पाटील,बाळू फेगडे,मुन्ना पाटील, चेतन आढळकर किशोर कुलकर्णी प्रगतशील शेतकरी प्रमोद नेमाडे,उज्जैनसिंग राजपूत,हर्षल पाटील,उमेश फेगडे,फेगडे सर,एम. बी.तडवी सर,प्रा.मुकेश येवले,
भूषण फेगडे,विजय गजरे,योगेश महाजन,फळ विक्रेता पाचपांडे, अमोल भिरूळ,व्यकटेश बारी, चेतन सपकाळे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.