Monday, March 17, 2025
Homeजळगावशासन स्थगितीने बिघडले ? भुसावळ पालिकेचे अंदाजपत्रक, परंतू यंदा १०० टक्के वसुली...

शासन स्थगितीने बिघडले ? भुसावळ पालिकेचे अंदाजपत्रक, परंतू यंदा १०० टक्के वसुली होणार प्रांत आधिकारींचे आश्वासन

शासन स्थगितीने बिघडले ? भुसावळ पालिकेचे अंदाजपत्रक, परंतू यंदा १०० टक्के वसुली होणार प्रांत आधिकारींचे आश्वासन
(खान्देशलाईव्ह न्यूज  भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ, ता. २५ : मालमत्ता कर पुनर्मूल्यांकन प्रक्रियेस शासनाने स्थगिती दिल्याने करवसुली प्रभावित झाली असून त्याचा थेट परिणाम नगर पालिकेच्या अंदाजपत्रकावर होणार आहे. मात्र यंदा १००टक्के पूर्ण वसुलीचे उद्दीष्ट पालिका पुर्ण करणार आहे. एक लाखां पेक्षा आधिक थकबाकी असलेल्यांनी कर भरण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याचे प्रांत आधिकारी तथा नगरपालिका प्रशासक यांनी सांगीतले.

उत्पन्नाची बाजूच लंगडी होणार असल्याने नगरपालिकेला अंदाजपत्रकच बदलविण्याची वेळ आली आहे. तिजोरीतील येणारे उत्पन्न थांबल्याने खर्च भागवायचा कसा? या पेचात नपा प्रशासन सापडले आहे.आमदार संजय सावकारे यांनी मुख्यमंत्र्यांकडून कर पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत स्थगिती मिळवली आहे. शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव यांनी तसे पत्र नपा प्रशासनाला पाठविले आहे. यामुळे नपा प्रशासनाकडून सुरू असलेली करवसुली थांबली आहे. त्यामुळे तिजोरीत येणारा पैसाही थांबला आहे. यापुढे मनपा प्रशासनाने खर्च कसा भागवायचा? असा यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे.मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये या स्रोतांच्या माध्यमातून ४१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित केले होते. २०२३-२४ पासून मालमत्ता सर्वेक्षण व मूल्यांकनानंतर मनपाच्या उत्पन्नात यापूर्वीच्या कर उत्पन्नाच्या तुलनेत सरासरी वाढ झाली आहे. नवीन मूल्यांकनानंतर निर्माण झालेल्या जनक्षोभानंतरही पालिकेच्या तिजोरीत १६ कोटींच्या जवळपास कर जमा झाला होता.असे असले तरी नपावर दायित्व अधिक आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासह कंत्राटदारांचे व पुरवठादारांचे देयक देण्याची बोंब आहे. पैशांचा ओघ थांबणार असल्याने विकासकामेही प्रभावित होण्याची शक्यता आहे. कामे घेण्यासाठी कंत्राटदार समोर येण्याची शक्यता कमी झाली आहे. स्वच्छतेची कामे कशी चालवायची? असा प्रश्न आ वासून उभा झाला आहे. मात्र यंदा कर वसुली करीता पालिकेने विविध पथकांची निर्मिती केली आहे. या पथकांच्या माध्यमातून १०० टक्के कर वसुसुलीचे केली जाणार असुन एक लाखाच्या वर थकबाकी धारकाच्या मालमत्ताचा लिलाव करून थकबाकी वसुल केली जाणार असल्याचे प्रांत आधिकारींचे नियोजन आहे

कोट:

 

Oplus_131072

करदेयक वितरित झाले आहेत. जे करदाते त्याप्रमाणे कर भरतील त्यांचा कर भरून घेणार आहोत. जे जुन्या दराने देतील तेसुद्धा घेणार आहोत. स्थगिती आली असली तर कर भरणा बंद करण्यात आलेला नाही. शासनाकडून यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शनाची आवश्यकता असून त्याची प्रतीक्षा आहे. तथापि स्थगितीमुळे अंदाजपत्रकावर परिणाम पडणार आहे.

जितें पाटिल
प्रांत अधीकारी तथा प्रशासक नगर पालीका भुसावळ

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या