शिरसाडला किनगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडीचे स्वागत..
२२ वर्षाची अखंड परंपरा.
यावल दि.२२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
गेल्या २२ वर्षापासून अखंडपणे शिरसाड ग्रामपंचायतीचे मा.उपसरपंच तथा वि.का.सोसायटी शिरसाडचे विद्यमान संचालक धनंजय पाटील सर व वि.का.सोसायटी शिरसाडचे मा.चेअरमन आर.ई.पाटील सर व संपूर्ण पाटील परिवाराकडून किनगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडीचा स्वागत सोहळा व महाप्रसाद कार्यक्रम आयोजन शिरसाड येथे राहत्या घरी करण्यात आला.
दिंडीचे स्वागत चोपडा विधानसभेच्या मा.आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे,यावल विधानसभेचे मा.आमदार रमेश दादा चौधरी,शेतकरी खरेदी विक्री संघाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, शेतकरी खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक मंडळ,तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी,विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,शेतकरी खरेदी विक्री संघाचे कर्मचारी तथा तालुक्यातील भाविक भक्त उपस्थित होते.तसेच रावेर यावल विधानसभेचे लोकप्रिय युवा आमदार अमोलदादा हरिभाऊ जावळे यांनी दुरध्वनी वरून सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व मान्यवरांचे व वारकऱ्यांचे, सर्व भक्त गणांचे कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे उपसभापती तेजस धनंजय पाटील यांनी आभार मानले.तसेच शिरसाद जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिंडी निमित्त स्नेह भोजन पाटील परिवाराकडून देण्यात आले होते. दिंडीचा स्वागत सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. दिंडीचे आगमन झाल्यानंतर संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.महाप्रसाद घेतल्यानंतर दुपारी दिंडीचे प्रस्थान यावलकडे झाले. शिरसाड येथील पाटील परिवार अखंडपणे वारकऱ्यांची सेवा करीत असल्याने परिसरात भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.