शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाचे 480 विद्यार्थ्यांनी केले अभिवाचन
अभिवाचनातून शिवरायांना अभिवादन : छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
भुसावळ – येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती पाठ्यपुस्तकावर आधारित शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत भुसावळ शहरासह तालुक्यातील 480 विद्यार्थ्यांनी अभिवाचनातून शिवरायांना अभिवादन केले. अनेक विद्यार्थ्यांनी वेशभूषा धारण करून सादरीकरण केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये पार पडली. उद्घाटन समारंभात माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, मुख्याध्यापक एस.जी. मेढे, दीपक धांडे, किरण मिस्त्री, संस्थाध्यक्ष डि.के. पाटील, उपाध्यक्ष संजीव पाटील, सचिव डॉ. जगदीश पाटील यांच्यासह परीक्षक उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागतगीत प्रेरणा घोटे हिने म्हटले. प्रास्ताविक डी.के. पाटील यांनी तर राजेंद्र आवटे व एस.जी. मेढे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर परीक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेची बैठक व्यवस्था डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुचिता पांढरकर यांनी केले. त्यानंतर पाचवी-सहावी, सातवी-आठवी आणि नववी-दहावी अशा तीन गटात वर्गनिहाय स्पर्धा पार पडली. त्यानंतर वर्गातच परीक्षकांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनी सावकारे, डॉ. छाया फालक व परीक्षक उपस्थित होते. परीक्षकांतर्फे पी.आर. विसपुते, प्रा. टी.बी. पाटील, मंगला पाटील व महानंदा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात सौ. रजनी सावकारे यांनी शिवरायांच्या चरित्राचा संस्कार बालमनात रूजवण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.
सुजाण परीक्षकांकडून परीक्षण –
शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत प्रा. टी.बी. पाटील, मोनाली उगले, दिनकर जावळे, आशा पाटील, सुपडू कुरकुरे, मंगला पाटील, आर.ए. ढाके, जयश्री ढाके, प्रकाश विसपुते, मीना राजपूत, महादेव हरिमकर, स्वाती भोळे, प्रा. बी.डी. चौधरी, महानंदा पाटील, एन.के. पाटील, सुरेखा पाटील, वंदना जंगले, रंजना पाटील, रमाकांत पाटील, मनीषा पाटील, वैशाली चौधरी, संध्या भोळे, कविता पाटील, स्वाती भोळे, राजेंद्र जावळे, योगेश गांधेले, प्रभाकर राऊत, शिशीर जावळे आदींनी परीक्षण केले.
तीन गटात 25 विजेते –
मराठी माध्यमातील पाचवी-सहावीच्या गटात खुशबू तायडे, अर्जुनसिंग राऊळ, पूर्वी न्हावकर, प्रेरणा घोटे, यशश्री सपकाळे, पायल चंदन, वेदांत पाटील, खुशी वारके, आराध्या वाणी. सातवी-आठवीच्या गटात गुंजन राणे, सोनाक्षी प्रजापती, मानसी सावळे, आराध्या सूर्यवंशी, मनोदेवी राजपूत, धनश्री पाटील, हंसिका महाले, विनीत चौधरी, टीना वारके, कुलदीपसिंग चितोडिया. नववी-दहावीच्या गटात रिया पाटील, समीक्षा खणके, प्राची चौधरी. इंग्रजी माध्यमातून दीपक पाटील, हेतल राठोड, कुशल झटकार अशा 25 विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.