Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाशिवजयंती मिरवणूकीत खुन्नसने का पाहतो म्हणतं युवकाची हत्या !

शिवजयंती मिरवणूकीत खुन्नसने का पाहतो म्हणतं युवकाची हत्या !

शिवजयंती मिरवणूकीत खुन्नसने का पाहतो म्हणतं युवकाची हत्या !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना आता पाचोरा शहरात शुल्लक कारणाने २० वर्षीय तरुणाची चाकू मारून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यात हेमंत संजय सोनवणे (20, जुना माहेजी नाका, महात्मा फुले नगर, पाचोरा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी संशयित रोहित गजानन लोणारी (20, शिव कॉलनी) यास अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, दि. 18 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवजयंती निमित्त मिरवणूक निघाली व मिरवणुकीनंतर हेमंत संजय सोनवणे (20) यास शहरातील बाहेरपुरा येथे रोहित गजानन लोणारी याने खुन्नसने का पाहतो म्हणून वाद घालत पोटात चाकू मारला व संशयीत पसार झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक पवार व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी हेमंत सोनवणे यास तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हेमंत सोनवणे हा गंभीर जखमी असल्याने त्यास सुरूवातील शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले व प्रथमोपचार करून लागलीच जळगाव सिव्हीलला उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून रोहित लोणारी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रोहित लोणारीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या