शिवसेना ( उध्दव ठाकरे ) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राजिनामा देणार ?
रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा आणि भुसावळ विधानसभा मतदार संघाचे शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विधानसभेच्या आधीच राजीनामा देणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भुसावळ आणि चोपडा या विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे जवळपास शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामूहिकरित्या विधानसभा निवडणुक पुर्व राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येतआहे. या विषयी लवकरच पत्रकार परीषद घेऊन प्रसिध्दीस माहिती दिली जाणार असल्याचे समजतेय.