शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांना मातृशोक
खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भुसावळ शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या मातोश्री सौ कमलबाई धर्मा महाजन यांचे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता वरणगाव येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे .
मृत्यु समयी 78 वर्षाच्या होत्या .
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी रात्री आठ वाजता जगदंबा नगर येथून समाधान महाजन यांच्या राहत्या घरून निघणार आहे .
समाधान महाजन सर हे वरणगाव येथील गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये शिक्षक पदावर नोकरीवर असून त्यांचे राजकारणामध्ये त्यांचा चांगले वर्चस्व आहे
त्यांच्या मातोश्रीच्या दुःखद निधनाने वरणगाव परिसरावर शोककळा पसरली आहे