शिवाजी महाराजांचे कार्य जनतेसाठी आजही प्रेरणादायी ; प्रा.निंबाळकर
यावल दि.२४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रबोधनी कार्यक्रमाअंतर्गत रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.रामेश्वर निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की छ. शिवाजी महाराज हे अठरा पगड जनतेच्या कल्याणासाठी लढणारे राजे होते.रयत सुखी तर स्वराज्य कारभार सुरळीत चालतो, राजमाता जिजाऊ यांच्याकडून संस्काराची शिदोरी घेऊन महिलांचा आदर, डोंगराळ भागातील गडकिल्ल्यांचे अचूक ज्ञान,बाजारपेठा सुरू केल्या,व्यापार,शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते असे सांगितले
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना महापुरुषांचे विचार आचरणात आणण्यासाठी शिवचरित्र वाचावे, शिवाजी महाराज हे जानते राजे होते.वयाच्या १३ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला,१६ व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, अष्टप्रधान मंडळ स्थापन केले,गनिमी कावा, निसर्ग प्रेमी,समुद्रातील प्रवासाला आरमार जहाज निर्माण केले, त्याकाळात बांधलेले गडकिल्ले हे सिसाचा दगड वापरल्याने आजही इतिहासाची साक्ष भरत आहेत, महाराजांच्या किर्तीचे पोवाडे वीर रसाने ओथंबून आवाज कडे कपारीत घुमत आहेत असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.संतोष जाधव यांनी केले तर आभार प्रा.अक्षय सपकाळे यांनी मानले.यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.संजय पाटील,डॉ. हेमंत भंगाळे,डॉ.आर डी पवार,प्रा. मनोज पाटील उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. वैशाली कोष्टी,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा. प्रतिभा रावते,प्रा.सुभाष कामडी, प्रा.हेमंत पाटील, प्रा.भावना बारी, प्रा.इमरान खान,मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी, प्रमोद भोईटे,प्रमोद कदम,दशरथ पाटील,रमेश साठे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.