शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याने तरुणावर चाकूने वार ; गुन्हा दाखल!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने प्रदीप गोकुळ पाटील (वय ४०, रा. कुवारखेडा, ता. जळगाव) या तरुणावर चाकूने वार करीत जखमी केले. ही घटना दि. ६ रोजी दुपारच्या सुमारास कुवारखेडा गावात घडली. याप्रकरणी रविंद्र भिमराव पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,जळगाव तालुक्यातील कुवारखेडा येथे प्रदीप पाटील हे वास्तवयास होते. दि. ६ रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या घरासमोर रविंद्र भिमराव पाटील हा विनाकारण शिवीगाळ करीत होता. प्रदीप पाटील यांनी त्याला तू शिवीगाळ का करीत आहे याचा जाब विचारला. त्याचा राम आल्याने रविंद्र पाटील याने प्रदीप पाटील यांच्यावर धारदार सूरी सारख्या चाकूने वार करीत जखमी केले. दरम्यान, प्रदीप पाटील यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रविंद्र पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ दिनेश पाटील करीत आहे