Wednesday, March 26, 2025
Homeजळगावशेतकऱ्यावर दु:खाचा डोंगर...बैलगाडी सहीत विहीरीत पडल्याने दोन्ही बैल मृत्युमुखी! 

शेतकऱ्यावर दु:खाचा डोंगर…बैलगाडी सहीत विहीरीत पडल्याने दोन्ही बैल मृत्युमुखी! 

शेतकऱ्यावर दु:खाचा डोंगर…बैलगाडी सहीत विहीरीत पडल्याने दोन्ही बैल मृत्युमुखी! 

पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील बांबरुड राणिचे येथील शेतकरी दगा ओंकार डांबरे यांची बैल जोडी व गाडी विहिरीत पडल्याने दोन्ही बैल मरण पावल्याची दुदैवी घटना घडली आहे .

बांबरुड राणिचे गावातील सर्वसाधारण कुटुंबातील कष्टाळू शेतकरी दगा ओंकार डांबरे यांचे दोघ बैल गाडी सोबत विहिरीमध्ये आज दुपारी पडले. त्यात दोघी बैलांचा दुर्देवी अंत झाला याप्रसंगी  गावातील सामाजिक कार्य करणाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच शेतात धाव घेऊन  शेतकऱ्यांच्या मदतीने व ट्रॅक्टर व जेसीबी च्या साह्याने वर काढले होते या घटनेचा तलाठी पल्लवी वाघ मॅडम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मृत बैलांचे  बांबरुड येथील सरकारी पशु वैद्यकीय अधिकारी यांनी शव विच्छेदन केले आहे. सदर शेतकरी यांची साधारण परिस्थती असल्या मुळे नागरीकांनी शेतकरी कुटुंबाला धीर दिला आहे.आता यापुढे सदर शेतकऱ्याची झालेल नुकसान मिळवुन देण्यास जिल्हा अधिकारी यांच्या कडे मागणी करण्यासाठी तलाठी साहेबांनी व गावातील प्रतिष्ठित लोकांनी सहकार्य करावे अशी गावातील सुजाण नागरिकांकडून मागणी होत आहे.

यावेळी घटनास्थळी राजु गंव्हाडे,पिंटु बांड,पिनु मोरे,छोटु बडगुजर, बंडु,भगवान डांबरे,विद्धेश्वर डांबरे,समाधान डांबरे,व इतर शेता जवळील शेतकरी होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या