Monday, March 24, 2025
Homeजळगावशेतमजुराचा गिरणा नदीपात्रात आढळला मृतदेह !

शेतमजुराचा गिरणा नदीपात्रात आढळला मृतदेह !

शेतमजुराचा गिरणा नदीपात्रात आढळला मृतदेह !

भडगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गुढे येथील शेतमजूर युवराज सोनवणे (४२) यांचा मृतदेह अखेर चार दिवसांनंतर भडगावनजीक गिरणा नदीपात्रात आढळला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सावदे केटिवेअरजवळ गिरणा नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेला असता तोल जाऊन बुडाला होता. त्याचा शोध नातेवाईक, पोलिस तसेच महसूल प्रशासन घेत होते. नदीला पाणी वाढल्यामुळे शोधमोहिमेला अडचण येत होती. अखेर त्याचा मृतदेह सोमवारी भडगावजवळ गिरणा नदीपात्रात सापडला. कुटुंबाच्या सदस्यांना ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आले होते. सापडलेला मृतदेह युवराज सोनवणे यांचाच असल्याने खात्री झाल्यानंतर त्याच ठिकाणी डॉक्टरांनी शवविच्छेदन केले.मृतदेह नदीकिनारी दफन करण्यात आला. दफन विधीची संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी तहसीलदार शीतल सोलाट, पोलिस तसेच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. मयत युवराज सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मली. दोन मले असा परिवार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या