Monday, March 24, 2025
Homeजळगावशेतातील सिमेंटचा पोल अंगावर पडून १० वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू !

शेतातील सिमेंटचा पोल अंगावर पडून १० वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू !

शेतातील सिमेंटचा पोल अंगावर पडून १० वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू !

भडगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शेतातील सिमेंटचा पोल अंगावर पडून १० वर्षीय बालकाचा करुण अंत झाला. ही घटना कनाशी, ता. भडगाव येथे मंगळवारी सकाळी घडली. दुर्दैव म्हणजे या बालकाचा ३० रोजी वाढदिवस साजरा होणार होता; त्या आधीच त्याचा असा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, हर्षवर्धन महेंद्र महाले असे या मृत बालकाचे नाव आहे. कजगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कनाशी येथील रहिवासी, तसेच पाचोरा बस आगारात चालक महेंद्र महाले यांचा हर्षवर्धन मुलगा होता. तो कनाशी जि. प. शाळेत तिसरीत शिकत होता. हर्षवर्धन हा सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार झाला होता. गणवेश घालून घराच्या ओट्यापर्यंत पोहोचला. त्यावेळी शेतात असलेली सायकल घेऊन शाळेत जाऊ या विचाराने तो शेताकडे गेला. त्याचवेळी शेतातील एक सिमेंटचा पोल या बालकाच्या अंगावर कोसळला आणि तो जागीच गतप्राण झाला. हा प्रकार परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच या बालकाच्या बचावासाठी ते धावले. मात्र, काही उपयोग होऊ शकला नाही.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या