Monday, March 17, 2025
Homeजळगावशेळगाव बॅरेजमुळे पाण्याची पातळी वाढली परंतु लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्या बौद्धिक क्षमतेची पातळी...

शेळगाव बॅरेजमुळे पाण्याची पातळी वाढली परंतु लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्या बौद्धिक क्षमतेची पातळी जशी आहे तशीच !

भुसावळ जवळील तापी नदी पुलावरील कठडे / रेलिंग तत्काळ वाढविण्याची जनतेची मागणी.

खान्देश लाईव्ह न्यूज संपादक संतोष शेलोडे – शेळगाव बॅरेज मध्ये या वर्षापासून शंभर टक्के पाणी अडविण्यात आल्याने भुसावळ शहराजवळ तापी नदी पुलाखाली नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली परंतु भुसावळ परिसरासह जळगाव जिल्ह्यातील जनतेच्या आर्थिक व जीवन मरणाची हानी होऊ नये या दृष्टिकोनातून मात्र लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकाऱ्यांची समय सूचकतेची बौद्धिक पातळी जशी आहे तशीच असल्याचे बोलले जात असून संपूर्ण भुसावळ विभागात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि तापी नदी पुलावरील कठड्याची उंची तत्काळ वाढवावी अशी मागणी सुद्धा जनतेमधून करण्यात येत आहे.

यावल,भुसावळ,जळगाव तालुक्याच्या सीमेला तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनेला स्पर्श करणाऱ्या शेळगाव बॅरेज मध्ये सन २०२४-२५ या वर्षात म्हणजे पावसाळ्यात शेळगाव बॅरेज मध्ये १०० टक्के पाणी अडविण्यात आल्याने भुसावळ यावल रस्त्यावर तथा फैजपूर भुसावळ रस्त्यावर असलेल्या भुसावळ शहराजवळ तापी नदी पुलाखाली पाण्याची पातळी वाढल्याने संपूर्ण भुसावळ परिसरातील जनतेच्या जीवन मरणाच्या म्हणजे आर्थिक व जीवित हानीच्या दृष्टिकोनातून पुलावरील कठड्याची उंची फारच कमी असल्याने तसेच तसेच या पुलावर जाणारे येणारे आणि भुसावळ शहरातील तसेच परिसरातील सर्व स्तरातील पुरुष- स्त्री,तरुण – तरुण सकाळी आणि संध्याकाळी वॉकिंग करताना, नैसर्गिक आनंद लुटताना सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी करतात यामुळे वाहतुकीस रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो,तापी नदीच्या या प्राचीन पुलावरून यावल,रावेर तालुक्यासह महाराष्ट्र,मध्यप्रदेश,गुजरात, राजस्थान,उत्तर प्रदेश,हरियाणा इत्यादी राज्यातील मालवाहतूक वाहनांची सुद्धा मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वर्दळ सुरू आहे

भुसावळ शहरा जवळ तापी नदीच्या पुलावरून तापी नदी पात्रात पाणी नसताना अनेकांनी उड्या मारून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आणि तशा नोंदी भुसावल पोलीस स्टेशनला नोंद झालेल्या आहे. आणि आता शेळगाव बॅरेज मध्ये शंभर टक्के पाणी अडविल्याने तापी नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने सर्वच बाबतीत अप्रिय घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.तापी नदी पुलावर सद्यस्थितीत असलेले कठड्यांची उंची फारच कमी असल्याने त्या ठिकाणी सर्व स्तरातील नागरिक स्त्री -पुरुष,तरुण तरुणी सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी करीत आहे,गुन्हेगारी क्षेत्रात सुद्धा या ठिकाणचा उपयोग केला जाऊ शकतो याची तत्काळ दक्षता,समय सुचकता संबंधित सर्व लोकप्रतिनिधी,अधिकाऱ्यांनी बाळगून मुक्ताईनगर तालुक्यात ज्याप्रमाणे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुलाचे कठडे लोखंडी अँगलने १५ ते २० फूट वाढविले त्याचप्रमाणे भुसावळ शहराजवळील तापी नदीवरील पुलाचे कठडे ( रेलिंग ) आचारसंहितेचे कारण न दाखविता तात्काळ लोखंडी मजबूत अँगल जाळीने वाढवावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या