Sunday, April 27, 2025
Homeजळगावशेळगाव बॅरेजवरून मंजुर यावल शहरासाठी पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया तत्काळ राबवा :...

शेळगाव बॅरेजवरून मंजुर यावल शहरासाठी पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया तत्काळ राबवा : अतुल पाटील यांची मागणी !

शेळगाव बॅरेजवरून मंजुर यावल शहरासाठी पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया तत्काळ राबवा : अतुल पाटील यांची मागणी !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत शेळगाव बॅरेज वरून यावल शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या योजनेस महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन निर्णय क्रमांक- नगरो -२०२४ / प्र. क्र.५०३/नवि -३३ नुसार दि.१५ ऑक्टो २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे.या प्रकल्पाच्या मंजुरीनंतर ७ दिवसाच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवून ३ महिन्याच्या कालावधीत कार्यादेश देण्यात यावा असे प्रशासकीय मंजुरी देताना शासन आदेश आहे.असे असून देखील अद्यापपावेतो निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. ती निविदा तात्काळ काढावी अशी मागणी केली पाटील यांनी केली आहे.
यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की निविदा प्रक्रिया राबवून व कार्यादेश देऊन शासनाकडे मंजुर प्रकल्पासाठी पहिल्या हप्त्याच्या निधीसाठी मागणी करावी अशी अट शासन निर्णयात नमुद आहे.परंतु निविदा प्रक्रिया न राबविल्या मुळे याजनेचे काम सुरू करण्यास व निधि प्राप्त होण्यास विलंब होत आहे.सदरची योजना शहरासाठी फार महत्वाची असुन ती लवकरात लवकर सुरू व्हावी असे सुद्धा यावल नगरपरिषद माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी नमूद केले आहे.यावल शहरातील विविध भागात नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून खुल्या जागेवर बगीचा निर्मिती केलेली आहे मात्र बहुतांशी बागीच्यांची देखभाल दुरुस्तीचे निविदा प्रक्रिया दिड वर्षांपासून न राबविल्यामुळे बागीच्यातील झाडे फुले व खेळणी यांची दुरावस्था झालेली आहे यास नगरपरिषद यावल यांची उदासीनता कारणीभूत असुन निविदा प्रक्रिया त्वरित राबवावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.नपा हद्दीतील इस्लामपूर ते आझादनगर भागास जोडण्यात येणार पुल बांधण्याच्या कामास तसेच विस्तारीत भागातील गंगानगर,तिरुपतीनगर,गणपतीनगरव आयेशा मशिदिकडे जाणारा रस्ता कामांचे कार्यादेश देऊन महिना उलटला तरी अद्यापपावेतो कामे सुरू नाहीत.त्याच बरोबर शिवाजीनगर,गजानन महाराज मंदिर परिसरात भागात काँक्रिट रोड व पेवर ब्लॉक बसविणे निविदा मुदत संपून देखील उघडण्यात आल्या नसुन यात नगरपरिषदेची उदासीनता,हलगर्जीपणा दिसून येत आहे.म्हणून वरील सर्व कामांमध्ये मुख्याधिकारी यांनी लक्ष देऊन सर्व कामे मार्गी लावावेत व नगरपालिकेचा कारभार गतिमान करावा अशी मागणी येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी लेखी पत्र देऊन केली आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या