Wednesday, March 26, 2025
Homeजळगावशेळ्यांच्या बंदिस्त वाड्यावर बिबट्याचा हल्ला ; १४ शेळ्या केल्या ठार

शेळ्यांच्या बंदिस्त वाड्यावर बिबट्याचा हल्ला ; १४ शेळ्या केल्या ठार

शेळ्यांच्या बंदिस्त वाड्यावर बिबट्याचा हल्ला ; १४ शेळ्या केल्या ठार

भडगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शेळ्यांच्या बंदिस्त वाड्यावर हल्ला करून बिबट्याने १४ शेळ्या ठार केल्या. ही थरारक घटना वाडे ता. भडगाव येथे रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

वाडे येथील पोलिसपाटील भूषण फकिरा पाटील यांचे बेलवाडी शिवारात शेत आहे. शेतातच बंदिस्त शेड बांधून त्याठिकाणी शेळ्या सोडण्यात आल्या होत्या. या शेडला सभोवताली ताराची उंच जाळी बसवलेली आहे. तरीही बिबट्याने जाळी आणि शेडवर चढून १४ शेळ्या ठार केल्या. रात्री केळीला पाणी देऊन तसेच शेळ्यांना चारा-पाणी देऊन हे शेतकरी घरी निघून गेले. भूषण पाटील व भाऊ कृष्णराम पाटील हे दोघेही सोमवारी सकाळी शेतात गेले असता शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. वनविभागाने पिंजरे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावून बिबट्याला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी, पशुमालकांनी केली आहे.केळीच्या बागेत चिखलात बिबट्यांचे मोठे व लहान ठसे आढळून आले. हे ठसे बिबट्यांचे असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, हा एकटा बिबट्याचा हल्ला नाही तर नर व मादी बिबट्या आणि लहान पिलू असा अंदाजे तीन बिबट्यांचा वावर असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बिबट्याने यापूर्वी केलेल्या हल्ल्यात वाडे, बांबरूड प्र. ब, बहाळ, नावरे शिवारात अनेक पशुधनाचे बळी गेले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या