Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्रश्री क्षेत्र प्रयागराज येथील कुंभमेळ्यात परमपूज्य अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर...

श्री क्षेत्र प्रयागराज येथील कुंभमेळ्यात परमपूज्य अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनां ” जगद्गुरु ” पदवी प्रधान

श्री क्षेत्र प्रयागराज येथील कुंभमेळ्यात परमपूज्य अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनां ” जगद्गुरु ” पदवी प्रधान

यावल दि.४  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
श्रीक्षेत्र वेरूळ ता.रत्नपुर ( खुलताबाद ) जि.छत्रपती संभाजी नगर येथील महाराष्ट्रातील संत परंपरेतील थोर संत कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज यांना श्री शंभू पंचदशनाम जुना आखाड्यांच्या वतीने “जगद्गुरु” ही पदवी प्रदान करण्यात आली जगद्गुरु पदाचा पट्टा अभिषेक सोहळा वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर रविवार दि.२ जानेवारी २०२५ रोजी श्री क्षेत्र प्रयागराज येथील कुंभमेळ्यात श्री शंभू पंचदशनाम जुना आखाड्यांच्या सर्व गुरुमुर्तींच्या प्रेरणेने व अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री पंचदशनाम जुना आखाडा पिठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते तसेच अनेक साधुसंतांच्या व भावीक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या उपाधीचे वैशिष्ठ म्हणजे श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज हे महाराष्ट्रातील पहिले संत ज्यांना श्री शंभू पंचदशनाम जुना आखाड्याने “जगद्गुरु” या उपाधीने सन्मानित केले आहे.आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी निर्मित केलेले आखाड्या मध्ये श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा ज्यांना आपण नागा साधू म्हणतो.भारतीय संस्कृतीचे रक्षण व प्रचार प्रसार व्हावा या उद्देशासाठी या आखाड्याची स्थापना अद्यगुरु शंकराचार्य यांनी केली आहे. आखाड्याच्या दृष्टीने निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांनी देशभरातील सर्व आखाड्यांमध्ये त्यांनी आपल्या निष्काम कार्यामुळे विशेष स्थान मिळवले होते.त्यांचे उत्तराधिकारी म्हणून अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जप ,तप,अनुष्ठान श्रमदान,गोसेवा,कृषी सेवा,गुरुकुल या परंपरा परिश्रमपूर्वक अविरतपणे पुढे नेत आहे.यासाठी देशभरातील प्रमुख ठिकाणी व महाराष्ट्रात जवळपास १०८ पेक्षा जास्त ठिकाणी आश्रमांची निर्मिती प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसारासाठी केली आहे.त्यांच्या या कार्याची विशेष दखल घेऊन श्री शंभू पंचदशना जुना आखाड्याने त्यांना “जगद्गुरु”या उपाधीने सन्मानित केले आहे.
महाराष्ट्रातील संत परंपरेचा हा मोठा गौरव असून जळगाव जिल्ह्यातील समस्त जय बाबाजी फक्त परिवारासह सर्व संत ,महंत, सामाजिक,अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून जगद्गुरु श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या