Sunday, March 16, 2025
Homeजळगावश्री भानु चौधरी साहित्य संस्कृती मंडळ संस्थेचे फैजपूर येथे उद्घाटन

श्री भानु चौधरी साहित्य संस्कृती मंडळ संस्थेचे फैजपूर येथे उद्घाटन

श्री भानु चौधरी साहित्य संस्कृती मंडळ संस्थेचे फैजपूर येथे उद्घाटन

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
दि. २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी श्री भानू चौधरी साहित्य संस्कृती मंडळ या संस्थेचे उद्घाटन मधुकंस उपासना कॉलनी येथे डॉ. जी.पी. पाटील यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खरगोन येथील सुप्रसिध्द डॉ. संतोष यादव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रतिभा ताई यादव उपस्थित होते.
उद्घाटनानंतर आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. दिलीप चौधरी यांनी स्व.भानू चौधरी यांच्या आठवणी जाग्या केल्या.
प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना डॉ. संतोष यादव आणि प्रतिभा ताई यांनी स्व.भानू चौधरी यांच्या साहित्य, संगीत, लेखन विषयाची आवड आणि त्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची जडण घडण कशी झाली या बद्दल सांगितले व संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. जी. पी. पाटील यांनी भानू सरांनी एक समृद्ध वारसा निर्माण केला आणि आज पर्यंत त्यांनी अनेक प्रकारचे लेखन केले.
अनेक कविता संग्रह लिहिले.त्यांचा हाच वारसा पुढील पिढी मध्ये निर्माण झाला असे सांगितले. शेवटी संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांनी समारोप केला. सौ. प्रीती चौधरी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली

या प्रसंगी उपासना कॉलनी मधील सर्व रहिवासी, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार तसेच संस्थेचे पदाधिकारी संजय चौधरी सर , प्रभात चौधरी सर , प्रा. हरीश तलेले सर , प्रा. उत्पल चौधरी सर, सौ. प्रीती चौधरी, सागर कोष्टी, अरुण राठोड उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या