श्री सदस्या तर्फे भुसावळ, यावल आणि चोपडा येथे स्वच्छता अभियान यशस्वीपणे संपन्न
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी. दिनांक २ मार्च २०२५, रविवार, डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या सौजन्याने भुसावळ, यावल आणि चोपडा या तीनही तालुक्यांमध्ये महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
पद्मश्री महाराष्ट्रभूषण आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 950 हून अधिक श्री सदस्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
सकाळी ८:३० ते ११:३०
दिनांक २ मार्च २०२५, रविवार
यावेळी भुसावळ येथील प्रमुख १३ शासकीय कार्यालय, यावल व चोपडा येथील शासकीय कार्यालय व शहरी भागातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. प्रशासनाच्या सहकार्याने संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता मोहिमेत नगरपरिषदेचे अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच पत्रकारांनी देखील सहभाग नोंदवला आहे .
या उपक्रमात ओला कचरा (किलो)
सुक्या कचऱ्याचे प्रमाण (किलो)
एकूण कचरा (किलो) असे वर्गीकरण करण्यात आले होते यासाठी ट्रॅक्टर/रिक्षा
आदी वाहने वापरण्यात आली .
विविध तालुक्या मधून 950 हून अधिक श्रीसदस्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला
या स्वच्छता मोहिमेत स्वयंस्फूर्तीने श्री सदस्यांनी सहभाग घेतला व वाहने उपलब्ध केलीत.
शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध हा उपक्रम होता .
यावेळी काही नागरिक व प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती .
संपूर्ण मोहिमेत शिस्तबद्ध पद्धतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती आणि सामाजिक बांधिलकी वाढविण्याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम संपन्न झाला आहे .