Sunday, April 27, 2025
Homeजळगावसंजय भाऊ सावकारे यांची कॅबिनेट मंत्री वर्णी लागल्याने भुसावळ शहरात जलोषात स्वागत

संजय भाऊ सावकारे यांची कॅबिनेट मंत्री वर्णी लागल्याने भुसावळ शहरात जलोषात स्वागत

संजय भाऊ सावकारे यांची कॅबिनेट मंत्री वर्णी लागल्याने भुसावळ शहरात जलोषात स्वागत

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मंत्री मंडळ विस्तारात भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कॅबिनेटपदी वर्णी लागली व शपथविधीसह खाते वाटपानंतर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे रविवार, 22 रोजी शहरात आगमन झाल्यानंतर त्यांची सायंकाळी जोरदार जल्लोष करीत स्वागत रॅली काढण्यात आली.
यावेळी उघड्या जीपमधून मंत्री सावकारे यांनी जनतेला अभिवादन केले तर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
मंत्री मंडळ विस्तारात सावकारे यांना वस्त्रोद्योग खाते मिळाले व रविवारी त्यांनी शेगाव नगरीत श्री संत गजानन महाराज यांचे सहपरिवार दर्शन घेत त्यानंतर मुक्ताई चे दर्शन घेतले वरणगांव परिसरात सत्कार झाल्यानंतर कारने भुसावळचे गाठले.

रविवार, 22 रोजी सायंकाळी यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यापासून त्यांची भव्य स्वागत रॅली काढण्यात आली होती .
उघड्या जीपवरून निघालेल्या रॅलीत मंत्री सावकारे यांनी जनतेला विनम्रपणे अभिवादन केले तर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जोरदार जल्लोष केला.

शहरातील भाजपसह मित्रपक्ष तसेच समर्थक व कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
भुसावळ शहराला सावकारेंच्या रुपाने पुन्हा मंत्रीपद मिळाल्याने शहरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंत्री महोदय संजय भाऊ सावकारे शहरात आल्यानंतर त्यांनी प्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर ते गांधी पुतळ्या जवळ येवून स्वागत रॅलीला सुरवात झाली.रॅलीत गांधी पुतळा परिसरात कार्यकर्त्यांनी क्रेनव्दारे हार घालून स्वागत केले
तर स्व. मोटूमल चांदवाणी चौकात माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी क्रेनव्दारे 300 किलो फुलांचा मोठा हार घालून मंत्री सावकारे यांचे स्वागत केले. शहरातील गांधी पुतळा, बाजारपेठ पोलीस ठाणे, जामनेररोड, भिरुड हॉस्पीटल, बियाणी स्कूल, प्रोफेसर कॉलनीमार्गे सुरभी नगरातील संपर्क कार्यालयापर्यंत रॅली निघून तेथे समारोप झाला.

 


भुसावळ करांनी अनेक वर्षानंतर अशी ऐतिहासीक रॅली अनुभव ली आहे .

भुसावळचे उद्योजक मनोज बियाणी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, माजी नगरसेवक गिरीश महाजन, पिंटू कोठारी, अॅड. बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, प्रा. दिनेश राठी, बापू महाजन, निकी बत्रा, अजय नागराणी, पिंटू ठाकूर, विशाल शहा, सोनू मांडे, किरण कोलते, किरण महाजन, उमेश नेमाडे, उद्योजक विजय चौधरी, चंद्रशेखर अग्रवाल आदींसह सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या