Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हासंतापजनक : आपल्या वृद्ध आईलाच केली धारदार वस्तूने मारहाण ; गुन्हा दाखल!

संतापजनक : आपल्या वृद्ध आईलाच केली धारदार वस्तूने मारहाण ; गुन्हा दाखल!

संतापजनक : आपल्या वृद्ध आईलाच केली धारदार वस्तूने मारहाण ; गुन्हा दाखल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – माझ्या सासूरवाडीला का जाता, अशी विचारणा करत व अन्य कौटुंबिक कारणावरून मंगलाबाई लालचंद परदेशी (६२, रा. शिवाजीनगर हुडको) यांना त्यांच्याच मुलाने मारहाण करत धारदार वस्तूने वार केला. तसेच भाऊ व भावजयीलाही शिवीगाळ केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, घटना गुरूवारी (३ ऑक्टोबर) शिवाजीनगरमधील अमर चौकात घडली. या प्रकरणी सुरेंद्र लालचंद परदेशी याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मंगलाबाई परदेशी या मोठा मुलगा गणेश परदेशी व सुनेसह राहतात तर दुसरा मुलगा सुरेंद्र परदेशी हा वेगळा राहतो. गुरूवारी मंगलाबाई या मोठा मुलगा व सुनेसह त्यांच्या दिराकडे घटस्थापनेच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यावेळी सुरेंद्रने तेथे येऊन आईला मारहाण करत हाताच्या मनगटावर धारदार वस्तूने वार केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या