संत रविदासांचे विचार अंगीकरून तरुणांची प्रगती करण्याचा निर्धार
प्रतिनिधी वरणगाव , खानदेश लाईव्ह न्युज
शहरातील रामपेठ भागातील संत रविदास नगर मध्ये संत रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी तरुण मुलांनी देशाप्रती व समाजाप्रती एकनिष्ठ राहून संत रविदास यांचे विचार अंगीकारून स्वतःची प्रगती करत इतरांना देखील या विचारांनी प्रेरित करण्याचा निर्धार करून संत रविदास यांची जयंती साजरी केली.
बुधवारी सायंकाळी संत रविदास नगरामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे, चंद्रकांत बढे,माजी नगरअध्यक्ष सुनील काळे, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी,नामदेव मोरे, माजी सरपंच सतीश चंदने,संतोष माळी, संभाजीराव देशमुख,दिलीप गायकवाड,महेश सोनवणे,राजेश इंगळे,लल्ला माळी,हितेश भंगाळे,प्रकाश जाधव,सतोष माळी,विजय चंदेले,मदन चंदने,मिलींद भैसे,नंदु चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रविदास नगराचे फलकाचे अनावरण करण्यात आले यानंतर संत रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर चंद्रकांत बढे म्हणाले की संत रोहिदास यांनी समाजातील विषमता व जातीभेद दूर करण्याचा प्रयत्न केला.सुनील काळे यांनी सांगितले की समाजातील भेदभाव दूर केले पाहिजे एकोप्याने राहिले पाहिजे हाच संदेश रोहिदासांनी दिला.
तरुणांचा संत रोहिदासांचे विचार अंगीकरण्याचा निर्धार –
एकविसाव्या युगामध्ये तंत्रज्ञानाचे युग असले तरी आजची पिढी ही वाचनापासून दूर जात असून मोबाईलच्या आहारी गेली आहे परंतु संत रोहिदासाचे विचार अंगीकारून त्याचा प्रचार व प्रसार करायचा व प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याचा निर्धार समाजातील तरुणांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र परसे यांनी तर आभार शैलेंद्र अहिरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी भरत चंदणे, गोपीलाल सतावकर,दिलीप लोहाळेकर,सुनिल चंदणे,भाऊलाल टिनटोरे,दिपक चंदणे,गणेश राजवेलकर,योगेश सतावकर,मुन्ना चंदणे , राजेश चंदने,सोनू चंदने,मुकेश चंदने,भोला टिंटोरे,आदी सर्व समाज बांधवानी परिश्रम घेतले .