Sunday, March 16, 2025
Homeभुसावळ“सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी" राष्ट्रवादीचे भुसावळात जनआंदोलन  !

“सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी” राष्ट्रवादीचे भुसावळात जनआंदोलन  !

“सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी” राष्ट्रवादीचे भुसावळात जनआंदोलन  !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – महाराष्ट्राचे ढिम्म सरकार फक्त घोषणा करतंय आणि लोकांना लॉलीपॉप देतंय. एव्हढी अतिवृष्टी झाली मात्र पंचनामे नाहीत की कोणते सरसकट अनुदान नाही, फक्त 7.5hp पर्यंत वि्जमाफी मग अल्पभूधारक बोअरवेल वाले शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत, पीकविमा द्यायला तयार नाही अश्या अनेक समस्या सोडवायला सरकार अजिबात तयार नाही या प्रमाणे  अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांना घेऊन  राष्ट्रवादी काँग्रेस आज ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भुसावळ येथे महात्मा गांधी पुतळ्या जवळ जन आंदोलन करणार आहे. तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन दिपक मराठे, तालुकाध्यक्ष व सर्व फ्रंटल चे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक , सरपंच व लोकप्रतिनिधी भुसावळ तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी केले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या