Tuesday, April 29, 2025
Homeजळगावसरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न.

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न.

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न.

यावल दि.१६  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलमध्ये जे.टी. महाजन इंग्लिश स्कूलमधील क्रीडापटू दिलीप संगले सर यांच्या उपस्थितीत वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उपस्थित संपन्न झाला.

यावल येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज गुरुवार दि.१६ जानेवारी २०२५ रोजी शाळेत वार्षिक क्रिडा महोत्सव साजरा करण्यात आला. दि.१६,१७,१८ जानेवारी २०२५ असा तीन दिवस क्रिडा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

तीन दिवसाच्या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल,फैजपूर येथील क्रिडापटू दिलीप संगेले सर उपस्थित राहणार आहेत.या तीन दिवसाच्या समारोहाचा शुभारंभ क्रिडापटू दिलीप संगेले सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. “खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो,निर्णय क्षमता,सहानुभूती,शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते, आणि या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो ” हे मोलाचे विचार प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. तसेच त्यांनी मशाल हाती घेऊन क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले.व इ. ६ वी च्या विद्यार्थ्यांनी लाठी- काठी हा खेळ सर्वांसमोर सादर केला.त्यानंतर प्रमुख पाहुणे, शाळेच्या मुख्याध्यापिका व क्लर्क सर यांच्यामध्ये क्रीडा स्पर्धेचा सामना घेऊन या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र महाजन सर व संस्थेचे संचालक शशीकांत फेगडे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शीला तायडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना महाजन मॅडम यांनी केले. व प्रमुख पाहुण्यांचे आभार सौ. अर्चना चौधरी मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमास प्रशांत फेगडे सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या