सरस्वती विद्या मंदिरात खरी कमाई उपक्रमाअंतर्गत आनंद मेळावा संपन्न.
यावल दि.७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात स्काऊट गाईड या विषयांनव्ये खरी कमाई या उपक्रमांतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक जी.डी.कुळकर्णी सर यांनी स्वीकारले.या आनंदमेळ्यात जवळजवळ २७ खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते.या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेले पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी पैसे देऊन या खाद्यपदार्थांना विकत घेतले व या ठिकाणी खाद्यपदार्थांना खात आनंद मेळाव्याचा मनसोक्त आनंद घेतला.
आनंद मेळाव्यात यामध्ये पाणीपुरी,भेळ,पाव वडा,बटाटा वडा, हरभरा उसळ,मठाची उसळ, पाणीपुरी,शेवपुरी,चायनीज पदार्थ, कचोरी,ढोकळे,समोसे,गुलाबजाम इतर पदार्थांची जणू मेजवानीच विद्यार्थ्यांसाठी होती.स्काऊट गाईड या विषयाला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सौ.एम.एम.गाजरे यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्काऊट गाईडचा सेवाभावी धर्म हा विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.आपल्या अध्यक्षभाषणात स्वावलंबनातून जीवन कसे जगतात याविषयी मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी उद्घाटक म्हणून प्रा.एस.एम. जोशी हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून संचालक बी.पी.वैद्य सर,ज्येष्ठ शिक्षक एन.डी.भारुडे,दीपक जोशी यांची उपस्थिती होती.या उपक्रमामध्ये ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.एम.एम.गाजरे मॅडम,भाऊसाहेब दीपक पाटील, एस.बी.चंदनकार,ए.एस.सूर्यवंशी, प्रा.बी.सी ठाकूर,एस डी चौधरी,ए. बी.शिंदे सर,नीलिमा पाटील मॅडम,वेदांत सराफ यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एम एम गाजरे मॅडम तर आभार डॉ.नरेंद्र महाले यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
आनंदमेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना वैयक्तिक जीवनामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन,स्वावलंबन आणि आर्थिक ज्ञान मिळण्यास मदत होणार आहे. शाळेतील अनेक उपक्रमांपैकी एक उत्तम अशा उपक्रम हा आहे.