Monday, April 28, 2025
Homeगुन्हासहा लाखांसाठी विवाहितेचा छळ : अखेर गुन्हा दाखल !

सहा लाखांसाठी विवाहितेचा छळ : अखेर गुन्हा दाखल !

सहा लाखांसाठी विवाहितेचा छळ : अखेर गुन्हा दाखल !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील कांचन नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी ठाणे येथे सहा लाखाची मागणी करत मारहाण व छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गुरूवारी ९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासू व दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील कांचन नगरातील माहेर असलेल्या रोहिणी भुषण सोनवणे (वय २४) यांचा विवाह ठाणे येथील भुषण उमाकांत सोनवणे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेले आहे. दरम्यान लग्नानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून वाद घालायला सुरूवात केली. त्यानंतर माहेराहून सहा लाख रूपये आणावे अशी मागणी करण्यात आली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ करत मारहाण करून छळ करण्यात आला.तसेच त्यांची सासू आणि दीर यांनी देखील पैशांसाठी छळ केला.

हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघुन गेल्या. त्यानंतर त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती भुषण उमाकांत सोनवणे, सासु छाया उमाकांत सोनवणे आणि दीर पवन उमाकांत सोनवणे सर्व रा. ठाणे यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश जाधव हे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या