साकेगाव येथे घंटागाडी लोकार्पण संपन्न
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन महायुती सरकारच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेज साकेगाव येथे नवीन बॅटरी वरील घंटागाडी प्राप्त झालेली असून घंटा गाड्यांचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते जिल्हा परिषदेला संपन्न झाला आहे
यावेळी स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी विलासराव पाटील , सरपंच हिराबाई कोळी यांचे चिरंजीव समाधान कोळी ,उपसरपंच माधुरी पवार यांचे पती गजानन पवार माजी सरपंच आनंद ठाकरे, सागर सोनवाल समाजसेवक गजू दादा कोळी ड्रायव्हर आलम पटेल यांची उपस्थिती होती .
आता गावाला दोन घंटा गाड्या ंच्या माध्यमातून सेवा व सुविधा प्राप्त झालेली आहे त्यामुळे निश्चितच गावात स्वच्छता राखण्यात मदत होणार आहे